Prahaar.in
        <link>https://www.prahaar.in</link>
बीएसएनएल 27 वा स्थापना दिन साजरा करणार; दूरसंचार क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाची यशस्वी वाटचाल
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) 1 ऑक्टोबर 2026 रोजी आपला 27 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आपल्या प्रवासाची 26 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. गेली अनेक वर्षे देशभरात अखंडित दूरसंवाद सेवा पुरवत असलेल्या बीएसएनएलने पारंपरिक लँडलाइन नेटवर्कपासून सुरवात करून मोबाइल, ब्रॉडबँड आणि अत्याधुनिक डिजिटल दळणवळण तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे अनुभवला आणि हाताळला आहे.(BSNL 27th Foundation Day)
देशाच्या डिजिटल विकासात महत्त्वपूर्ण सहभाग
पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आणि दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागांतर्गत येणारा हा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मोबाईल, भारत फायबर एफटीटीएच ब्रॉडबँड, फिक्स्ड-लाइन आणि विविध एंटरप्राइझ सेवा पुरवतो. ही संस्था देशातील ग्रामीण, दुर्गम आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. तसेच 'भारतनेट' (BharatNet) सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्येही बीएसएनएलची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
विदर्भातील दूरसंचार जाळ्याचा विस्तार
विदर्भ क्षेत्रात, बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राने आपल्या दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरणावर विशेष भर दिला आहे. याद्वारे व्यापक प्रमाणावर ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारण्यात आले असून 'भारत फायबर' सेवांचा प्रभावी विस्तार करण्यात आला आहे. हे भक्कम नेटवर्क बुटीबोरी आणि हिंगणा यांसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांसह नागपूर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना, तसेच विविध सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि व्यावसायिक आस्थापनांना दर्जेदार सेवा पुरवत आहे.(BSNL 27th Foundation Day)
https://www.prahaar.in/2026/09/30/pm-modi-us-president-trump-phone-conversation-trade-defence/
भविष्यातील वाटचाल आणि 4G सेवांचा विस्तार
स्थापना दिनानिमित्त बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राच्या प्रधान महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी संस्थेचे सर्व कर्मचारी आणि भागधारकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, सध्या देशभरात सुरू असलेली 4G सेवांची जलद अंमलबजावणी आणि व्यापक नेटवर्क विस्तार हा वापरकर्त्यांच्या बदलत्या संपर्कविषयक आणि डिजिटल गरजा पूर्ण करण्याच्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकांना अधिक वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देण्याच बद्धपरिकर राहून बीएसएनएल आगामी काळातही आपले सेवा जाळे अधिक बळकट करणार आहे.
भारताचा ऐतिहासिक विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचं विजयी लक्ष्य गाठलं
      <description>भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी 406 धावांच आव्हान ठेवलं होतं. हे लक्ष्य तसं कठीण होतं. पण कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या झंझावाती खेळीमुळे हा विजय सोपा झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेस्ट इंडिजने 50 षटकात 7 गडी गमवून 405 धावा केल्या आणि विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर हे खूपच कठीण आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची कामगिरी कशी असेल? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम होता. मात्र कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 255 धावांची भागीदारी केली. 158 चेंडूत 255 धावा केल्याने वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर गेला.(IND VS WI)
https://www.prahaar.in/2026/09/30/icc-odi-rankings-virat-kohli-second-place-shubman-gill-kuldeep-yadav/
रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही शुभमन गिलने किल्ला लढवणं सुरूच ठेवलं. त्याला विराट कोहली साथ मिळाली. शुभमन गिलने या दरम्यान दीड शतकी खेळी आणि द्विशतकाच्या दिशेने कूच केली. शुभमन गिलच्या प्रत्येक फटक्यावर वेस्ट इंडिजच्या हातून विजय निसटत गेला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच 400 पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. तेव्हा भारताने 360 धावांचे लक्ष्य गाठले होते.
https://www.prahaar.in/2026/09/30/shubman-gill-scored-a-century-in-the-second-consecutive-match-against-the-west-indies/
भारतामध्ये कोणत्याही संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात गाठलेले हे सर्वात मोठे विजयी लक्ष्य ठरले आहे. यापूर्वी जयपूर 2013 मध्ये भारताने आणि रायपूरमध्ये 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 360 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले होते. जागतिक पातळीवर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी चेझ ठरला आहे. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचे लक्ष्य गाठून अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारताने 400 हून अधिक धावा करून इतिहास रचला आहे.
एकाच सामन्यात ५ शतकांचा विक्रम
या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 5 फलंदाजांनी शतके झळकावली. वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल (101), शाय होप (104) आणि अमीर जांगू (114) यांनी शतके झळकावली, तर भारताकडून रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिल (द्विशतक) यांनी शतके केली.
भारताचा दणदणीत विजय; वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने मात
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 405 धावा उभारून भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत हे आव्हान सहज पार केले.
गिलची विक्रमी खेळी
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला शुभमन गिल. गिलने शानदार द्विशतकी खेळी करत 223 धावा फटकावल्या. त्याला रोहित शर्माची दमदार साथ मिळाली. भारताने अवघ्या 43.3 षटकांत 406 धावांचे लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला.
मालिकेत भारताची आघाडी
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने उभारलेल्या 405 धावांच्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने आपली फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.(IND VS WI)</description>
शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज
      <description>नवी दिल्ली: संपूर्ण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. कर्णधार शुभमन गिलने आपल्या खेळीने विक्रमी धावांचा डोंगर रचला आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या वनडे सामन्यात 200 धावा पूर्ण केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलने सामन्याचे खरे हिरो ठरले आहेत. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यामध्ये टीम इंडियासमोर 406 धावांचं आव्हान आहे. 200 धावांची विक्रमी खेळी केल्यानंतर शुभमन गिलच्या फॅन्सकडून कौतुकाचं वर्षाव होत आहे.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत विक्रमी द्विशतकी खेळी केली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गिलने आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा सुरेख मिलाफ साधत 200 धावांचा टप्पा पार केला. या खेळीमुळे त्याच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
गिलसाठी वनडे क्रिकेटमधील हे दुसरे द्विशतक आहे. याआधी त्याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. त्या वेळी तो पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता.
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकांचा विचार केला तर भारताचा रोहित शर्मा सर्वाधिक तीन द्विशतकांसह आघाडीवर आहे. रोहितने 264, 209 आणि 208 धावांच्या खेळी केल्या आहेत. याशिवाय मार्टिन गप्टिल 237*, वीरेंद्र सेहवाग 219, ख्रिस गेल 215, फखर जमान 210*, इशान किशन 210 आणि पथुम निसांका 210* या फलंदाजांनीही द्विशतके झळकावली आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/30/rohit-sharma-scores-a-century-against-west-indies-stakes-his-claim-for-the-odi-world-cup-2027/
गिलची ही कामगिरी त्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. ICCच्या नोंदीनुसार गिलने वनडेमध्ये 2000 धावांचा टप्पाही वेगाने गाठला असून तो या विक्रमातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे.
या सामन्यातील द्विशतकामुळे गिलने केवळ वैयक्तिक विक्रमाची भर घातली नाही, तर भारताच्या मोठ्या धावसंख्येच्या पाठलागाला निर्णायक दिशा दिली. त्यामुळे गिलची ही खेळी भारतीय वनडे क्रिकेटमधील आणखी एका संस्मरणीय डावाच्या रूपात नोंदली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा
      <description>नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधला आहे. या संवादादरम्यान दोन्ही जागतिक नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. भारत आणि अमेरिका यांच्यातील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या कटिबद्धतेचा यावेळी उभय नेत्यांकडून जोरदार पुनरुच्चार करण्यात आला.(Modi Trump phone call)
https://www.prahaar.in/2026/09/30/minister-chandrashekhar-bawankule-make-aadhaar-card-compulsory-for-registration-at-igr-department/
द्विपक्षीय संबंध आणि परस्पर सहकार्याला बळ
चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर सकारात्मक चर्चा केली. दोन्ही देशांतील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सतत आणि नियमित संपर्कात राहण्यावर त्यांनी सहमती दर्शवली. व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वाढत्या भागीदारीमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विशेषतः संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पांवर आणि भविष्यातील योजनांवरही दोन्ही नेत्यांचे सकारात्मक विचारविनिमय झाले.
प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार-विनिमय
केवळ द्विपक्षीय मुद्द्यांपुरते मर्यादित न राहता, दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही एकमेकांशी विचार-विनिमय केला. जागतिक शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची त्यांनी समीक्षा केली. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत-अमेरिकेची मैत्री अत्यंत महत्त्वाची ठरत असून, जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्यावर त्यांनी भर दिला.(Modi Trump phone call)
भविष्यातही अशाच प्रकारे एकमेकांच्या संपर्कात राहून धोरणात्मक मुद्द्यांवर समन्वय साधण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली असून, या संवादाने भारत-अमेरिका संबंधांच्या दृढतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
Aadhaar Card News: उद्यापासून सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, वाचा सविस्तर...
      <description>मुंबई: स्थावर मालमत्तेशी संबंधित दस्तनोंदणीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता कोणत्याही दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणी यांसह ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी हा नियम लागू राहणार असून, १ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. आधार नसल्यास संबंधित व्यक्तीला आधार नोंदणीची पावती आणि अन्य सरकारी ओळखपत्रांसह आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यांची पडताळणी झाल्यानंतरच दस्तनोंदणी पूर्ण केली जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/30/cm-devendra-fadnavis-meeting-with-mpsc-aspirants-gave-assurance-or-transfer-mpsc-secretary-mahendra-harpalkar-offline-exams/
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये खोटे पक्षकार किंवा साक्षीदार उभे करून होणारी फसवणूक रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्याच्या महसूल विभागांतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत स्थावर मालमत्तांशी संबंधित दस्तनोंदणीची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत आधारचा वापर अनिवार्य केल्यामुळे व्यवहारातील संबंधित व्यक्तीची ओळख अधिक प्रभावीपणे पडताळता येणार आहे. तसेच नोंदणी प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत होईल, असा शासनाचा उद्देश आहे.
ज्या व्यक्तींकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही, त्यांना आधार नोंदणी केल्याची पावती सादर करावी लागेल. त्यासोबत अन्य सरकारी ओळखपत्रे आणि व्यवहारातील संबंधित व्यक्तीशी असलेले नाते सिद्ध करणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच दस्तनोंदणीचा व्यवहार अंतिम केला जाईल.
https://www.prahaar.in/2026/09/30/20-cases-of-dengue-and-12-cases-of-malaria-have-been-detected-in-the-taloja-navi-mumbai-construction-activities-and-stagnant-water-have-raised-health-concerns/
बालकांसाठी स्वतंत्र तरतूद 
18 वर्षांखालील बालकांच्या बाबतीत त्यांच्या माता-पिता किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीनेच आधार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. केवळ आधार क्रमांक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्तनोंदणीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद अधिसूचनेत करण्यात आली आहे. नव्या व्यवस्थेमुळे दस्तनोंदणीच्या वेळी संबंधित पक्षकारांची ओळख निश्चित करण्याबरोबरच बनावट व्यक्तींच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून 63 प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी नव्या ओळख पडताळणी प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.</description>
Singer Sunil Lodhi: 'हनुमान अंश'च्या निर्मात्यांचं कौतुक; 'मैंने तेरे ही भरोसे हनुमान' गाण्याच्या दृष्टीहीन गायकासाठी घेतला मोठा निर्णय
      <description>मुंबई: आध्यात्मिक गुरू नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. अवघ्या 1.5 कोटी ते 2 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने दीड महिन्यामध्ये 408 कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवले आहे, पण गाण्यांनीही प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. चित्रपटातील 'मैंने तेरे ही भरोसे हनुमान' आणि ' पार्वती' गाण्याने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करताना या गाण्यांचे अनेक रिल आपल्याला पाहायला मिळतात. 'मैंने तेरे ही भरोसे हनुमान' गाण्याच्या सिंगरने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या गायका संबंधित एक महत्त्वाची बातमी आहे.
https://www.prahaar.in/2026/09/30/ramayana-casting-why-ranbir-kapoor-was-chosen-as-lord-ram-makers-reveal-the-reason-in-video/
'मैंने तेरे ही भरोसे हनुमान' गाणं गायक सुनिल लोधी या तरूणाने गायलं आहे. सुनील लोधी पूर्वीपासूनच दृष्टीहीन आहे. या दृष्टिहीन गायकावर उपचार करण्याचा संपूर्ण खर्च चित्रपटाच्या निर्मात्या करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत अनुप्रिया नागर यांनी सांगितले की, "जेव्हा सुनील मुंबईत येईल, तेव्हा त्याच्या डोळ्यांची नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करून घेणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच्या डोळ्यांवर उपचार केले जाण्याची शक्यता आहे. अद्याप त्याच्यावर कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार? हे ठरलेलं नाहीये. सुनील बालपणापासूनच दृष्टिहीन आहे. सुनील काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आला होता, त्यावेळी त्याची एका नेत्रतज्ज्ञांकडे अपॉईंटमेंट घेतली होती, पण त्यावेळी त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत."
https://www.prahaar.in/2026/09/30/ghanshyam-darode-chhota-pudhari-buys-his-own-home-at-just-21-ghanshyam-darode-gets-emotional-while-sharing-this-special-moment-with-fans/
अनुपप्रिया यांनी सांगितले की, सुनीलसोबत बोलताना ती त्याच्या विचारांनी आणि त्याची देवावर असलेल्या श्रद्धेमुळे खूप प्रभावित झाली. तिने मुलाखती दरम्यान सांगितले की, "कठीण परिस्थितीतही सुनील आपल्या यशाचे आणि आयुष्यात मिळालेल्या प्रेमाचे सर्व श्रेय हनुमानजींना देतो. जेव्हा मी सुनील भैय्याशी बोलते, तेव्हा मला जाणवते की लोकांच्या मनामध्ये खूप निराशा आहे. अनेकदा लोकंही देवाला म्हणतात की, 'तू माझ्यासोबत नाहीस, तू माझ्या विरोधात आहेस.' पण जेव्हा जेव्हा मी सुनील भैय्याशी बोलते, तेव्हा तो नेहमी सर्व श्रेय महाराजजी आणि हनुमानजींना देतो. सुनील हे लहानपणापासूनच दृष्टिहीन आहेत. मला वाटतं की, जर ते प्रेम अनुभवू शकतात, तर त्यांना ते प्रेम पाहण्याची संधीही मिळायला हवी."
https://www.prahaar.in/2026/09/30/asha-bhosle-asha-bhosle-held-her-breath-to-sing-but-the-song-was-banned-on-the-radio/
अनुपप्रिया यांच्या आधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही गायक सुनील लोधी यांची भेट घेऊ त्यांना उपचारासाठी मदतीचे आश्वासन दिले होते. लोधी यांनी 4 सप्टेंबर रोजी भोपाळमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, जिथे त्यांनी त्यांचे एक प्रसिद्ध भजन गायले. मुख्यमंत्र्यांनी 1 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आणि त्यांच्या शिक्षणासाठी व डोळ्यांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.</description>
Powai Lake: पवई तलावांत जाणारे सांडपाणी १०० टक्के बंद
      <description>मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे (एटीपी) वळविण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत एकूण 3 हजार 56 मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या असून, त्यामुळे 1 ऑक्टोबर 2026 पासून पवई तलावात मलजल मिसळण्यास पूर्णतः आळा बसेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.या उपाययोजनांमुळे पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाचे प्रमाण नियंत्रित होऊन तलावाच्या जलप्रदूषणास आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/30/brihanmumbai-munciple-corporation-97-percent-ganesh-idols-immersion-in-artificial-lakes-mumbai-news/
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तलाव प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून त्याचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, पवई तलावात येणाऱ्या मलजलाच्‍या प्रवाहास प्रतिबंध करणे तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामार्फत मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, ही प्रमुख कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी 30 सप्‍टेंबर 2026 रोजी प्रकल्पस्थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली.तसेच, कामांची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. निर्धारित वेळेत आणि आवश्यक त्या गुणवत्तेच्या निकषांनुसार कामे पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.
https://www.prahaar.in/2026/09/30/bmc-ayushman-vaya-vandana-cards-senior-citizens-mumbai-october-2/
पवई तलाव हा सन 1891 मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर 223 हेक्टर इतका आहे. जवळपास 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टरवर पसरले असून तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये दररोज येणारे सुमारे 18 दशलक्ष लीटर मलजल यामुळे जल प्रदूषण होत आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्‍या मलः निसारण प्रकल्प आणि मुंबई मलःनिसारण विल्‍हेवाट प्रकल्‍प या विभागांनी तलावात मलजल मिसळणा-या एकूण 20 विसर्ग बिंदूंची (आऊटफॉल) पाहणी केली. त्‍यापैकी 1 ते 18 विसर्ग बिंदू आदि शंकराचार्य मार्गावर तर 2 विसर्ग बिंदू तलावाच्‍या उत्‍तरे दिशेकडील पेरूगेट या ठिकाणी आहेत.
पवई तलावात येणाऱ्या मलजल प्रवाहास प्रतिबंध करण्यासाठी मलःनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत 18 मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. या कामांतर्गत एकूण 3 हजार 56 मीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत. मलजलाचा बिगरपावसाळी प्रवाह आदि शंकराचार्य मार्गावरील विद्यमान मलनिस्सारण वाहिनीद्वारे भांडुप येथील मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आला असून, या कामानंतर खोदण्यात आलेल्या चरांचे पुनर्स्थापना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, पेरूगेट येथील दोन मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/30/municipal-corporations-encroachment-department-carried-out-a-major-crackdown-on-20-unauthorized-structures-and-15-stalls-in-borivali/
यासमवेतच, पवई येथील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर 8 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्‍यात येत आहे. मुंबई मलनि:सारण प्रकल्प यांच्‍यामार्फत मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्‍याची कार्यवाही सुरू आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राद्वारे मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून 8 दशलक्ष लीटर शुद्ध पाणी पुन्‍हा तलावात सोडण्‍यात येणार आहे. निविदेनुसार काम पूर्णत्‍वाचा कालावधी डिसेंबर 2028 आहे. तथापि, मे २०२७ पर्यंत मलजल प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण करण्‍याचे महानगरपालिकेचे प्रयत्‍न आहेत. हे मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्‍यानंतर 8 दशलक्ष लीटर मलजल या मलजल केंद्राकडे आणि उर्वरित 8 दशलक्ष लीटर मलजल भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे नेण्‍यात येणार आहे. या प्रसंगी उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रकल्‍प) संजयकुमार पांडव, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्‍प) राजेंद्र परब यांच्‍यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवई तलावात मलजल मिसळत असल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. पवई तलाव हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसंस्था असल्याने त्याची जल गुणवत्ता अबाधित राखणे आणि तलावात मिसळणाऱ्या मलजलास प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने मलजल प्रवाहांना अडवून ते मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.</description>
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल २ लाख ५९ हजारांहून अधिक भाविक, नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ
      <description>मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि मुंबई महापौर वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमास मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वंकष मोहिमेत एकूण २ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांनी विनामूल्य उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय व आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
या मोहिमेत २५५ सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडपांमधील शिबिरांसह महानगरपालिकेचे १८९ दवाखाने, २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ८३ नागरी प्राथमिक आरोग्य व कल्याण केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. त्याचप्रमाणे, विविध नगरसेवक प्रभागांमध्ये २५५ ठिकाणी असंसर्गजन्य रोग तपासणी करण्यात आली.
ही सर्व ठिकाणे लक्षात घेता मोहिमेच्या कालावधीत एकूण ५ हजार ७४० आरोग्य तपासणी सत्रे मुंबईत पार पडली. या शिबिरांचा १ लाख ३८ हजार ४९२ पुरुष तर १ लाख २० हजार ५१४ महिला याप्रमाणे एकूण २ लाख ५९ हजार ००६ नागरिकांनी लाभ घेतला.(Mumbai Health Camp)
या विशेष आरोग्य मोहिमेत सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सहकार्याने आयोजित २५५ शिबिरांमध्ये ११ हजार २१८ भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. महानगरपालिकेच्या १८९ दवाखान्यांमध्ये ८४ हजार १४२ नागरिक, २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये ८३ हजार ६१ नागरिक आणि ८३ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ३७ हजार ७२७ नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्याव्यतिरिक्त नगरसेवक प्रभागांमध्ये ठिकठिकाणी करण्यात आलेल्या असंसर्गजन्य रोग निदान तपासणीचा ४२ हजार ८५८ नागरिकांनी लाभ घेतला.
या संपूर्ण कालावधीत सर्व केंद्रांवर मिळून एकूण २१ हजार ४०५ नागरिकांची ताप तपासणी, १ हजार ३२६ अतिसार (गॅस्ट्रो) रुग्ण तपासणी, ४ हजार ७५२ संशयित क्षयरोग (टीबी) तपासणी आणि हिवताप (मलेरिया) निदानासाठी एकूण १५ हजार ४४९ रक्त नमुने घेण्यात आले.
या मोहिमेदरम्यान असंसर्गजन्य आजारांच्या लवकर निदानावर विशेष भर देण्यात आला होता. मुंबईभरात एकूण ३२ हजार ४२८ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १ हजार ६६० नवीन उच्च रक्तदाब रुग्णांचे वेळेवर निदान झाले. त्याचप्रमाणे, एकूण २२ हजार ८०५ नागरिकांची मधुमेह चाचणी घेण्यात आली असता, त्यातून १ हजार ५७ नवीन मधुमेह रुग्णांची नव्याने ओळख पटली.
या सर्व तपासण्यांनंतर अधिक सखोल तपासणी व उपचारांची गरज भासलेल्या एकूण २ हजार २२९ रुग्णांना महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.(Mumbai Health Camp)</description>
Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा
      <description>मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या 383 कृत्रिम तलावांमध्ये हे विसर्जन करण्यात आले. ही पर्यावरणपूरकता जपण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व श्रीगणेशभक्तांचे मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आभार मानले आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात आणि उप आयुक्त (परिमंडळ - 2) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीत यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
यंदाच्या श्रीगणेशोत्सवात मुंबई एकूण 1 लाख 97 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 6 फुटांपर्यंतच्या एकूण 1 लाख 92 हजार 237 श्रीगणेशमूर्तींचे 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये 1 लाख 22 हजार 391 पीओपी मूर्ती आणि 69 हजार 846 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. तर 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या 5 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे 67 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये 5 हजार 259 पीओपी आणि 123 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
महानगरपालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची व्यापक व्यवस्था केली होती. मुंबईत विविध ठिकाणी 383 कृत्रिम तलाव, तसेच समुद्रकिनारे, चौपाट्या आणि अन्य ठिकाणी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आली होती. 6 फुटांपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या 6 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींची संख्या 1 लाख 22 हजार 391, तर शाडू मातीच्या मूर्तींची संख्या 69 हजार 846 आहे. अशा प्रकारे 6 फुटांपर्यंतच्या एकूण 1 लाख 92 हजार 237 मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. त्याचवेळी 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी नैसर्गिक विसर्जन स्थळांचा वापर करण्यात आला. या ठिकाणी 5 हजार 259 पीओपी आणि 123 शाडू मातीच्या, अशा एकूण 5 हजार 382 मूर्तींचे विसर्जन झाले.
https://www.prahaar.in/2026/09/30/municipal-corporation-recovers-18-7-lakh-fine-unhygienic-conditions/
मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जनामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम तलावात श्रीगणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मूर्तिकारांना पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्यासाठी 940 मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी 25 हजार 400 लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली होती. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. उच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना केल्या.</description>
BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर
      <description>मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल. दिनांक २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांच्या कालवधीसाठी महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात राबविण्यात येणार आहे. अभियानअंतर्गत मुंबईतील अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच ७० हून अधिक वयोमान असलेल्या जेष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आभा कार्डची उपलब्धतता ही अत्यंत मदतीची ठरणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने उपचारांची उपलब्धतता सहजरित्या होण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या अभियानात सहभाग व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे. मुंबईतील मोठ्या प्रमाणात नागरिकांना आभा कार्डच्या माध्यमातून फायदा व्हावा, यादृष्टीने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या अभियानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट अभियानासाठी प्रामुख्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे. अधिकाधिक नागरिकांना आभा कार्डच्या नोंदणीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त आभा कार्ड नोंदणी अभियानाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाच्या अभियानात मुंबईकर नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांची नोंद आभा कार्ड नोंदणीसाठी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांची हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करावी. तसेच सर्व पात्र डॉक्टर, परिचारिका, आयुष वैद्य, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदींची हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/30/central-railway-holiday-special-trains-mumbai-madgaon-nagpur/
अभियानाची उद्दिष्टे
आरोग्य नोंदी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट-आभाशी जोडणे आणि महानगरपालिका रूग्णांमध्ये बाह्यरूग्णसेवांमध्ये ,ई प्रस्क्रिप्शन, ई डिस्चार्ज समरी, डिजिटल लॅब / रेडिओलॉजी अहवाल आणि ईएमआर/ एचएमआयएस यासारख्या आयुष्मान डिजिटल भारत मिशनसोबतच्या सुसंगत डिजिटल सेवा वाडविणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान एकूण तीन टप्प्प्यांमध्ये मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.(BMC Campaign)
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात जनजागृती मोहीम, अधिकारी - कर्मचारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि स्वयंसेवक नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रचार साहित्याचे वितरण करण्यात येईल.
दुसरा टप्पा
या टप्प्यात रूग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, प्रसूतिगृहे, प्रशासकीय विभाग कार्यालये, शाळा - महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी वस्त्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्र येथे मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येईल. महानगरपालिका मुख्यालय, विभागीय आणि प्रशासकीय कार्यालये येथे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.
तिसरा टप्पा
जेेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी घरपोच / विशेष जनसंपर्क मोहीम आयोजित करण्यात येईल. तसेच आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आयुषमान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) ही डिजिटल ओळख उपलब्ध करून अपेक्षित आहे. त्यासोबतच आरोग्य संस्था आणि आरोग्य व्यावसायिकांना राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी जोडणे अपेक्षित आहे.
शिधावाटप केंद्रावर पीएमजेएवाय/एमजेपीजेएवाय कार्ड नोंदणी
मुंबईतील पीएमजेएवाय/एमजेपीजेएवाय कार्ड पात्र लाभार्थ्यांसाठी सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका यांच्यामार्फत शिधावाटप दुकानांवर तयार करण्यात येतील. शिधावाटप दुकानांवर येणाऱ्या पात्र शिधापत्रधारकांची ओळख पटविणे, दुकानांचे वेळापत्रक निश्चित करणे, रेशन कार्ड / ई केवायसी आधारे पात्रता पडताळणी करण्यात येईल. या कामासाठी सीएचव्ही, आशा यांच्यामार्फत शिधावाटप केंद्रावर कार्ड तयार करण्यात येतील.(BMC Campaign)</description>